T20 World Cup: Live सामना सुरु असताना लहान बाळासोबत मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपदरम्यान एक छोटा मुलगा जमिनीवर डोक्यावरच पडला.
मुंबई : सामन्यादरम्यान अनेक चित्र विचित्र गोष्टी पहायला मिळतात. मग भले तो सामना क्रिकेटचा असो किंवा इतर कोणता. दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आला असताना एका सामन्यादरम्यान मैदानातच एक साप घुसला होता. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर प्रंचंड व्हायरल झाला. तर आता ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान देखील अशीच एक गोष्ट पहायला मिळाली.
ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपदरम्यान एक छोटा मुलगा जमिनीवर डोक्यावरच पडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा मुलगा इतक्या जोरात पडला की त्याचा हा व्हिडीयो पाहून चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली.
मूल जमिनीवर पडते
पात्रता फेरीमध्ये वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याच्या वेळी ही दुर्घटना घडली. या व्हिडीयोमध्ये असं दिसून येतंय की, हा मुलगा खेळत होता. खेळता खेळता त्याचा पाय घसरला आणि तो लोखंडी पाईपाला धडकला आणि त्याचं डोकं जमिनीवर आपटलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे (सीए) सीईओ निक हॉकले यांनीही याच व्हिडिओ पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, 'आशा आहे सर्व काही ठीक असेल. हे बाळ ठीक असेल असं मानूया.'
सामन्यामध्ये झाला मोठा उलटफेर
सोमवारी वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात हा सामना खेळला गेला होता. पात्रता फेरीतील ब गटातील हा तिसरा सामना होता. या सामन्यात इतकी मोठी उलथापालथ होण्याची अपेक्षाही नव्हती. पण स्कॉटलंड टीमने विंडीजला 42 रन्सने पराभूत केलं.
होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, पण प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. जॉर्ज मुनसेच्या अर्धशतकामुळे स्कॉटलंड टीमने मोठी धावसंख्या उभारली. स्कॉटलंडने 5 गड्यांच्या मोबदल्यात 160 रन्स केल्या. मुन्सीने 53 बॉल्समध्ये 66 रन्सची उत्तम खेळी केली. विंडीजसाठी अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डर यांनाच 2-2 विकेट घेता आल्या.