T20 WC : `टीम इंडियामध्ये सतत बदल...`; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासा
T20 WC : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय.
Rahul Dravid reveals unlisten aspects of his tenure : आयीसीसी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर संपूर्ण टीम 4 जुलैला भारतात दाखल झाली. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma)) टी20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यासोबत राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपलाय. अशातच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय. बीसीसीआयने (BCCI Video) जारी केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल याने मोठा खुलासा केलाय.
'टीम इंडियामध्ये सतत बदल...'
राहुल द्रविड या व्हिडीओमध्ये म्हणाला की, मला सातत्य आवडतं. मला संघात खूप जणांना वगळणे आणि बदल करणे आवडत नाही. कारण मला विश्वास आहे, यामुळे संघात खूप अस्थिरता निर्माण होते. त्याशिवाय फार चांगले वातावरण राहत नाही.'
ते पुढे असे म्हणाले की, 'मला असं वाटतं की मी अशा संघाचा भाग आहे जो योग्य जबाबदारीसह व्यावसायिक सुरक्षिता आणि पौष्टिक वातावरण असल्याने अपयशाची भीती नाही. मात्र लोकांना पुढे नेण्यासाठी पुरेसं आव्हान असतं तरी त्यांना प्रोत्साहन देणं हा माझा नेहमीच प्रयत्न असतो'
'...तो काळ कठीण होता'
द्रविड म्हणाला की, 'कोरोना काळात जेव्हा खेळाडू बाहेर पडले तेव्हा तो कठीण काळ होता. अर्धा डझन कर्णधारांसोबत काम करावं लागंल असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्या प्रशिक्षक होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही कोरोनाच्या निर्बंधातून बाहेर पडत होतो. आम्हाला तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्कलोड मॅनेज करायचा होता. काही खेळाडू जखमी होते आणि त्यामुळे मला 8-10 महिन्यांत पाच-सहा कर्णधारांसोबत काम करण्याची वेळ आली. मी कल्पनाही केली नव्हती किंवा विचारही केला नव्हता. पण ते नैसर्गिकरित्या घडत होतं.'
'हे खूप सकारात्मक झालं'
तो पुढे म्हणाला की, 'कोविडचं निर्बंध उठल्यानंतर सकारात्मक गोष्ट म्हणजे आम्ही भरपूर क्रिकेट खेळलो. गेल्या अडीच वर्षांत आम्ही अनेक युवा खेळाडूंना संधी दिलीय. अलिकडच्या काळात आम्ही काही युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्येही संधी दिलीय.' द्रविड हा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बऱ्याच काळापासून ओळखतो. दोघांनीही कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.
'अन् विराटच्या त्या कृतीचा चुकीचा अर्थ लावला गेला'
तो म्हणाला, 'मी ज्याला खूप दिवसांपासून ओळखत होतो त्या रोहितसोबत काम करताना मला खूप आनंद झाला. मी त्याला एक व्यक्ती आणि कर्णधार म्हणून परिपक्व होताना पाहिलं. संघाप्रती त्याची बांधिलकी आणि खेळाडूंबद्दलची त्याची काळजी घेणारी वृत्ती मला खूप आवडली. त्याने संघात असं वातावरण निर्माण केलं की सर्वांना सुरक्षित वाटतं. ही गोष्ट ज्याची मला कमी भासणार आहे. तर विराटसोबतही जो माझ्या सुरुवातीच्या काळात कर्णधार होता. मला त्याला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली. ते खूप रोमांचक होते. त्याने नेहमी प्रक्रियेकडे लक्ष दिलंय, ज्याचा काही प्रसंगी चुकीचा अर्थ लावला गेला.'
'शेवटी ही माझी जबाबदारी होती'
व्हिडीओमध्ये ते पुढे म्हणाला की, 'माझ्यासाठी निकाल खूप महत्त्वाचं होतं. मी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं आणि लोकांना असं वाटलं की मला परिणाम महत्त्वाचा वाटत नाही. निश्चितच निकाल महत्त्वाचा असतो. द्रविड म्हणाला, 'मी अशा स्थितीत होतो ज्यामध्ये निकाल महत्त्वाचा होता, माक्ष प्रशिक्षक म्हणून मला अनुकूल निकाल मिळविण्यात मदत करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल याचा विचार करणेही गरजेचे होतं. सरतेशेवटी माझी जबाबदारी कर्णधाराला त्याची रणनीती योग्य रीतीने राबवण्यात मदत करण्याची होती.'