Dinesh Karthik : पोरानं मैदान मारलं अन् बाप टाचा वर करून घोळक्यात उभा होता!
Dinesh Karthik Father : सरावाच्या मध्यभागी मुलाला भेटण्याऐवजी, त्याच्या वडिलांनी सामान्य लोकांप्रमाणे थांबणं योग्य मानलं. लोकांमध्ये थांबून त्यांनी लेकाची वाट पाहिली.
T20 World cup Dinesh Karthik: सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) भारतीय संघाने आक्रमक खेळी करत पाकिस्तानला (Pakistan) लोळवलं. या सामन्यात भारताच्या सर्वच खेळाडूंनी कमाल केली. विराट कोहलीने (Virat Kohli) नेतृत्व हाती घेत धावा चोपल्या, तर त्याआधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना मैदानात थांबू दिलं नाही. या सामन्यात चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे सर्वांचा लाडका डीके... म्हणजेच Dinesh Karthik...
भारतीय संघातील खेळाडू दिनेश कार्तिकचे वडील (Dinesh Karthik Father) सध्या त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आहेत. खरं तर, ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला (Austrelia) पोहोचले होते. मात्र, त्यावेळी दिनेश कार्तिक मैदानात सराव करत होता. त्यावेळी आपल्या लेकाला भेटण्याचा पर्यत्न त्यांनी केला. मात्र, त्यांना ते जमलं नाही.
सरावाच्या मध्यभागी मुलाला भेटण्याऐवजी, त्याच्या वडिलांनी सामान्य लोकांप्रमाणे थांबणं योग्य मानलं. लोकांमध्ये थांबून त्यांनी लेकाची वाट पाहिली. त्यावेळी डीके मैदानावर कमाल दाखवत होता. सत्र संपल्यानंतर दोघांची भेट झाली. त्याआधी काही पत्रकारांना याची भनक लागल्यानंतर त्यांनी डीकेच्या वडिलांची मुलाखत घेतली.
मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (Ind VS Pak) सामना पाहण्यासाठी जगभरातील चाहते जमले होते. मात्र, कार्तिकचे वडील विमानात असल्याने सामना पाहण्यासाठी यावेळी पोहोचू शकले नाहीत. पाकिस्तानविरुद्ध डीके अवघ्या 1 धावा करून धावबाद झाला. सराव सत्रात तो खूप घाम गाळताना दिसला आहे आणि विशेषतः अश्विन आणि चहलच्या फिरकी चेंडूंवर त्याने सराव केलाय.
आणखी वाचा - फुटबॉल खेळताना विराटला भिडला पंत, Video पाहून तुम्हीच ठरवा...कोण अव्वल?
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डीकेला (Dinesh Karthik) चांगली कामगिरी करता आली नाही. तरी डीकेने विकेटमागे भन्नाट कामगिरी केली. महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाचा फिनिशर म्हणून डीके भूमिका निभावत आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेत कार्तिकची बॅट तळपेल आणि भारताचा वर्ल्ड कप जिंकवून देईल, अशी अपेक्षा आहे.