T20 World Cup 2021 : सेमीफायनलमध्ये पोहोचणारी ही ठरली पहिली टीम
भारताला 2 वेळा पराभवाचा सामना.... पण हा संघ पोहोचला सेमीफायनलमध्ये...
दुबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दोन सामने पराभूत झाले आहेत. आता उर्वरित तीन संघांसोबतचे सामने टीम इंडियाला जिंकावेच लागणार आहेत. T20 World Cup मध्ये चार सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की कऱणार हा पहिलाच संघ ठरला आहे.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड झालेल्या सामन्यात ब्रिटिश टीमने श्रीलंका संघावर मात करून विजय मिळवला. त्याच सोबत सेमीफायनलमध्ये स्थान पक्क केलं आहे. इंग्लंड संघ सलग 4 सामने जिंकला आहे.
टी-20 विश्वचषकात इंग्लंडने सलग चौथा सामना जिंकला. आता संघाचे 8 गुण झाले असून सोमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. श्रीलंकेला 4 सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. हा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेचा संघ 19 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाला आहे. श्रीलंका संघाचा 137 धावांवर डाव आटोपला. इंग्लंडने 26 धावांनी श्रीलंका संघावर विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
इंग्लिश संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 163 धावा करत श्रीलंकेला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले. जोस बटलरने कारकिर्दीतील पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. तो 101 धावांवर नाबाद परतला. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने 3 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सने तर न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंड संघ जर पराभूत झाला तरच टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता धूसर असणार आहे.