India vs Pakistan T20 World Cup 2022 : दिवाळी सणाला कालपासून सुरूवात झाली आहे. याच शुभमुहूर्तावर भारतच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीची प्रतिक्षा आहे. सगळेच या मॅचची आतुरतेने वाट पाहतायत. भारत-पाक सामन्यात चाहत्यांना क्रिकेटचा (Cricket) एक वेगळा रोमांच, थरार अनुभवता येतो. मात्र याचदरम्यान क्रिकेट प्रेमी ज्या सामन्याची आतुरतेने  वाटत पाहत आहेत त्या महामुकाबल्यावर संकट येण्याची शक्यता आहे. (T20 World Cup ind vs pak match melbourne weather update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात (t20 world cup 2022) भारताला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भारतीय संघाचा प्रयत्न त्या पराभवाची बरोबरी करून स्पर्धेत विजयीची सुरुवात करून पुढे जाण्याचा आहे. आज भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्याचा क्षण जवळ येतो. मेलबर्नच्या मैदानात दोन्ही टीम्स आमने-सामने येतील. या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर महासंकट आहे. जमीन नाही, तर आकाशातून हे संकट कोसळू शकतं. 


आनंदावर विरजण पडू शकतं


मेलबर्नमधील (Melbourne) ताज्या हवामान खात्यानुसार, भारत आणि पाकिस्तानचा (Ind vs Pak)  सामना सुरू होण्यापूर्वी अजूनही आकाशात काळे ढग आहेत. परंतु चांगली गोष्ट म्हणजे एक दिवस आधीसारखा पाऊस पडत नाही. दिवसभरात पावसाची शक्यता आहे. पण तीही केवळ 20 टक्के. म्हणजे ज्याला नाममात्र पाऊस म्हणता येईल. मेलबर्नच्या हवामानात झालेल्या या बदलामुळे भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. 


आकाशात काळे ढग, पावसाची शक्यता कमी


मेलबर्नच्या (Melbourne) हवामानात काही बदल झाला नाही, तर भारत-पाकिस्तान क्रिकेट संघांमधील 20-20 षटकांचा संपूर्ण सामना क्रिकेट चाहत्यांना नक्कीच पाहायला मिळेल, हे स्पष्ट आहे. असे झाल्यास चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला खेळताना पाहण्याची संधी मिळेल.


वाचा :  IND vs PAK 'महामुकाबला' किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या वेळ आणि सर्वकाही एका क्लिकवर... 


दोन्ही संघ - 
टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी. 
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.


पाकिस्तान संघ: बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू:  मोहम्मद हारिस, शाहनवाज दहनी.