Virat Kohli T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं.  भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. या सामन्यात विराट कोहलीने केलेला रॉकेट थ्रो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.  ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्बेन येथे खेळल्या सराव सामन्यात विराट कोहलीने केलेल्या रॉकेट थ्रोमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज टीम डेव्हिडला तंबूचा रस्ता दाखवला. या थ्रोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, कांगारूंच्या संघाने 18.1 षटकापर्यंत 171 धावा केल्या होत्या आणि त्यांचा विजय जवळपास निश्चित होता. परंतु 18 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने आपल्या रॉकेट थ्रोने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिडला धावबाद केले आणि संपूर्ण सामना फिरला. विराट कोहलीने टीम डेव्हिडला धावबाद केले. त्याने 5 धावा केल्या होत्या. कारण टीम डेव्हिड जर मैदानात असता तर त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला असता. 



Kagiso Rabada नं सासू-सासऱ्यांची केली हिंदीत मनधरणी, Video पाहून तुम्हीही हसाल


भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर. अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, दीपक हुड्डा


ऑस्ट्रेलिया संघ- मिशेल मार्श, आरोन फिंच, स्टीव स्मिथ, ग्लेम मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, जोश इंग्लिस, पॅट कमिन्स, अशटोन अगर, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, जोश हेझलवूड, मॅथ्यू वडे, डेविड वॉर्नर, अॅडम झम्पा