IND vs AUS: मिचेल स्टार्कचा तो वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि... पाहा Video
Aus vs India T-20 World Cup 2022 : मिचेल स्टार्कने टाकलेला वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि क्रिकेट फॅन्सच्या काळजाचा ठोका चूकला
Suryakumar Yadav Mitchell Starc: टी20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) आज सराव सामना (Practice Match) खेळवण्यात आला. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला (India beat Australia). संपूर्ण सामन्यात शमीने एकच ओव्हर टाकली. पण या ओव्हरमध्ये त्याने केवळ 4 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर सूर्यकुमारने हाफसेंच्युरी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.
सूर्यकुमार जबरदस्त फॉर्मात
सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या असून आयसीसीच्या क्रमवारीतही (ICC Ranking) त्याने मोठी झेप घेतली आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही सूर्यकुमारने धडाकेबाज फलंदाजी केली. सुर्यकुमारने 33 चेंडूत 50 धावा केल्या. यात 6 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता.
सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला चेंडू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात सूर्यकुमारच्या फलंदाजीने क्रिकेट फॅन्सचं लक्ष वेधून घेतलं. पण सामन्यात क्रिकेट फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. सामन्याच्या 19 व्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) एका वेगवान चेंडूवर सूर्यकुमारने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण सूर्यकुमारचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. जोराचा आवाज झाला आणि मैदानावर एकच शांतता परसरली. सुदैवाने हेल्मेट असल्याने सूर्यकुमार थोडक्यात बचावला. पण हेल्मेट तुटलं.
सूर्यकुमार जबरदस्त फॉर्मात
2022 हे वर्ष सूर्यकुमार यादवसाठी महत्वाचं वर्ष ठरतंय. या वर्षात सूर्यकुमार यादवने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. मैदानाच्या प्रत्येक भागात फटका मारण्याची त्याची क्षमता आहे, यामुळेच त्याला भारताचा एबी डिव्हिलिअर्सही बोललं जातं. टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवकडून टीमला मोठ्या अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादवने भारतासाठी 34 टी20 सामन्यात 1045 धावा केल्या आहेत.