मुंबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये आधीच खेळाडूंना दुखापत होत असल्याने संघांना मोठा तोटा होत आहे. याच दरम्यान क्रीडा विश्वातून एक मोठी अपडेट येत आहे. ऐन टी 20 वर्ल्ड कप दरम्यान एक खेळाडू कॅन्सरशी लढत असल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट करून याबद्दल माहिती देण्यात आली. ही बातमी समोर येताच अनेक क्रिकेटप्रेमीं भावुक झाले. तर लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एलन लॅम्ब प्रोस्टेट कर्करोगाशी (prostate cancer) झुंज देत असल्याचा खुलासा केला 67 वर्षांच्या लॅम्बे यांची ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'मी सर्व पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर (prostate cancer) म्हणून त्यांची PSA पातळी तपासण्याची विनंती करतो. जेणेकरून ते शोधता येईल.' त्यांनी पुढे लिहिले की, 'नुकतेच प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, मी नुकताच एक महिना उपचार पूर्ण केला आहे. 


तुमचा अहंकार बाजूला ठेवा, तुमच्या आरोग्याबाबत अनभिज्ञ राहू नका. असं आवाहन प्रोस्टेट कॅन्सर बाबत करत एलन लॅम्ब यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. लॅम्बे यांनी दोन ऐशेज ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. तर तीन वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कॅन्सरच्या या बातमीनंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. 


ट्वीटरवर चाहते लॅम्ब यांना लवकर बरं व्हावं यासाठी चाहते, क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू देवाकडे प्रार्थना करत आहेत. या बातमीनंतर अनेक खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. लॅम्ब हे एके काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. त्यांचा विक्रमही खूप चांगला आहे. विश्वचषक आणि ऍशेससारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने कमाल केली होती.