AUS vs SL, T20 World Cup: मंगळवारी पर्थ स्टेडियमवर (Perth Stadium) खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलेंकेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. मार्कस स्टॉयनिसच्या वादळी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 7 गडी राखून (AUS vs SL) पराभव केला. रोमांचक झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या क्षणी श्रीलंकन गोलंदाजांना लोळवत सामना खिश्यात टाकला. त्यामुळे आता T20 World Cup मध्ये श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.


Marcus Stoinis ने नवा विक्रम रचला -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसने या सामन्यात वादळ निर्माण केलं. सुरूवातीपासून तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. या वादळी खेळीमुळे त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. T20 World Cup मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा मार्कस स्टॉयनिस दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी पहिल्या स्थानावर भारताचा महान ऑलराऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) विराजमान आहे.


आणखी वाचा - स्टॉयनिसच्या वादळासमोर लंकेची दाणादाण, यजमानांचा श्रीलंकेवर दमदार विजय


Marcus Stoinis ने आणखी एक विक्रम त्याने नावावर केला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मार्कस स्टॉयनिस पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानं डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाही मागं टाकलंय. केवळ 17 बॉलमध्ये स्टॉयनिसने अर्धशतक झळकावलं. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या स्टॉयनिसच्या नावाची चर्चा आहे. T20 World Cup मध्ये 17 बॉलवर अर्धशतक करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.


पाहा AUS vs SL सामन्याची हायलाईट - 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, भारताचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंहने T20 World Cup मध्ये 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर अद्याप कोणत्याही खेळाडूला हा विक्रम मोडता आला नाही. त्यावेळी युवराजने 6 चेंडूत 6 षटकार देखील खेचले होते. आता मार्कस स्टॉयनिसने धमाकेदार विजय ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात टाकला आहे.