Ind vs Ban : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (ICC T20 World Cup) भारताने (india) बांगलादेश (bangladesh) विरुद्ध पावसाने व्यत्यय आणलेला सामना पाच धावांनी जिंकला आणि गट-2 गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलय. भारत आणि बांगलादेश (ind vs ban) यांच्यात टी- 20 विश्वचषकाचा (T20 World Cup) सर्वात रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने (India) बाजी मारली, पण बांगलादेशने (bangladesh) कडवी टक्कर दिली. सामना संपेपर्यंत बांगलादेशच्या खेळाडूंनी हार मानली नाही आणि क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला. भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानचा (pakistan) उपांत्य फेरीतील मार्ग आता आणखी कठिण बनला आहे. या सामन्यात बऱ्याच रोमांचक घटना घडल्या आहेत. अशातच एक ट्विट (Tweet) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (T20 World Cup pakistani fans reactions before ind vs ban match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात पाकिस्तानी प्रेक्षकांचीही चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली. सामन्यात एक वेळ अशी आली होती की, भारत सामना गमावू शकतो असे वाटत होते. मात्र त्यानंतर पाऊस पडला आणि बांगलादेशला (bangladesh) 16 षटकांत 151 धावा करण्याचे लक्ष्य मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 184 धावा केल्या. भारताच्या हातातून सामना जाणार असल्याचे दिसत असताना, अनेक पाकिस्तानी चाहते आनंदात होते. काही जणांनी हा निसर्गाचा नियम आहे असे म्हटले तर कुणी भारत सामना जिंकला तर नाव बदलेल, असे म्हटले.


ट्विटरवर (twitter) स्वत:ला अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणवणाऱ्या सेहर शिनवारी (Sehar Shinwari) नावाच्या एका पाकिस्तानी (pakistan) महिलेने असं काही ट्विट केलय की ते व्हायरल होत आहे. 'भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला तर मी माझे नाव सेहर शिनवारीवरून बदलून नरेंद्र मोदी असे करेन,' असे या पाकिस्तानी महिलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



दरम्यान, या स्पर्धेच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये केएल राहुल (KL Rahul) फ्लॉप ठरला होता आणि त्याला संघातून वगळण्यात आल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. राहुल या सामन्यात फॉर्ममध्ये परतला आणि त्याने दाखवून दिले की त्याला हलके घेतले जाऊ शकत नाही. केएल राहुलने 32 चेंडूत 50 धावांची खेळी केली आणि यावेळी त्याने तीन चौकार आणि चार षटकार मारले. तर दुसरीकडे अॅडलेड ओव्हलशी विराट कोहलीचे (virat kohli) नाते खूप जुने आहे. विराट जेव्हा या मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येतील, याची खात्री असतेच. सामन्यात विराट कोहलीने (virat kohli) 44 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.