T20 World Cup 2022 Ind Vs Pak : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup ) भारतीय क्रिकेट (Team india) टीमच्या प्रदर्शनावर क्रिकेट विश्वाच्या नजरा असणार आहेत. फक्त भारतीय क्रिकेट वर्तुळच नव्हे, तर संघाचा एकंदर फॉर्म पाहता जगभरातील क्रिकेट जगतातून या संघाबाबत प्रचंड अपेक्षा आहेत. याच अपेक्षांच्या बळावर संघ पहिलाच सामना पाकिस्तानविरोधात खेळणार आहे. रविवारी असणाऱ्या याच बहुप्रतिक्षित सामन्याआधी दोन्ही Teams मधील खेळाडूंनी त्यांच्या खेळावर मेहनत घेण्यासही सुरुवात केली आहे. पण, या सामन्याआधीच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, गंभीर दुखापतीच्या पार्श्वभूमीवर एका खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फलंदाज शान मसूदला (shan masood) सराव सत्रादरम्यान (practice session) डोक्यावरच चेंडूचा मार बसला. पाकिस्तान (Pakistan) संघ मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये (melbourne cricket ground) सराव करत असतानाच मोहम्मद नवाज (mohammad nawaz) गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर शानचा फलंदाजीचा सराव सुरु होता. 


अधिक वाचा : T20 World Cup 2022 : रोहित शर्माचं टेन्शन संपलं, Sunil Gavaskar यांनी दाखवला 'गोल्डन' मार्ग!


सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच एकाएकी एक चेंडू त्याच्या डोक्यावरच आदळला. ज्यानंतर मसूद मैदानाच पडला. शान मसूदला हा फटका बसल्यानंतर तिथं असणाऱ्या pakistan team च्या खेळाडूंचा काळजाचा ठोका चुकला. मोहम्मद नवाजच्या पायाखालची जमीन सरकली. खेळाडूंनी तातडीनं आपल्या साथीदाराला सांभाळून घेतलं आणि तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं. 



अद्यापही या पाकिस्तानी खेळाडूची प्रकृती नेमकी कशी आहे, याबाबतची माहित समोर येऊ शकलेली नाही. पण, शान ज्या पद्धतीनं मैदानावर पडला, ते पाहता त्याची दुखापत गंभीर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानच्या संघावर ओढावलेलं हे संकट आणि या घटनेची सध्या क्रिडाजगतात चर्चा सुरु आहे.