विराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा
T20 World Cup 2024: विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोणता खेळाडू उतरायला हवे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडलाय.
T20 World Cup 2024: टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपचा पाहिलाच सामना अगदी सहज जिंकला. भारताने दुबळ्या आर्यलंडवर 8 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर तसेच कर्णधार रोहित शर्माने दमदार फटकेबाजी केली. रोहित जखमी झाल्याने मैदानातून बाहेर गेला. दरम्यान विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोणता खेळाडू उतरायला हवे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडलाय. यावर भारतीय टीमचे बॅटींग कोच विक्रम राठोड यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली आहे.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपर- बॅट्समन ऋषभ पंत तिसऱ्या नंबरवर बॅटींग करत राहील, असे राठोड म्हणाले. तसेच त्यांनी हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरही आनंद व्यक्त केला. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने आयपीएलमधून पुन्हा कमबॅक केलंय. मोठ्या ब्रेकनंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतायत. आयर्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाने 8 विकेट्सने विजय मिळवला. यामध्ये दोघांची भूमिका महत्वाची ठरली.
ऋषभ पंत चांगली बॅटींग करतोय. प्रॅक्टीस मॅच आणि आयर्लंड मॅचमध्ये त्याने चांगली बॅटींग केलीय. त्यामुळे सध्या आमच्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन तोच आहे. त्याच्या बॅटींगचा टीमला फायदा होतोय, असे राठोड म्हणाले.
ऑक्टोबर 2023 नंतर पहिली मॅच खेळणाऱ्या हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 27 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कप 2023 मध्ये बांग्लादेशविरुद्ध पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर टीमला एका ऑल राऊंडरची गरज होती. सुर्यकुमारची बॅटदेखील तळपत नव्हती. टीमचे संतुलन बिघडले होते. दरम्यान हार्दिक पाड्यांने चांगला खेळ केलाय. प्रॅक्टीस मॅचमध्ये तो चांगली बॉलिंग करतोय. पूर्ण 4 ओव्हर टाकण्यासाठी तो फीट आहे. वेगाने चांगल्या टप्प्यातील बॉलिंग चांगले संकेत देत असल्याचेही राठोड म्हणाले.
खेळपट्टीवरुन आयसीसीवर टीका
भारताचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाणने खेळपट्टीवरुन आयसीसीवर टीका केली आहे. ही खेळपट्टी फार खराब आहे. जर अशी खेळपट्टी भारतात असती तर त्यावर पुन्हा सामना झाला नसता. आयसीसीने यावर आधी काही सामने खेळवायला हवे होते. अशा खेळपट्टींवर थेट सामने खेळवणं चुकीचं आहे. इरफानने समालोचन करताना हे विधान केलंय.
हर्षा भोगले यांनाही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली.खेळपट्टींचं काही तरी करावं लागेल. या खेळपट्टीवर भारत-पाकिस्तान सामन्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तसंच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद कैफने अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी चांगली जाहिरात नाही असं हर्षा यांनी म्हटलं आहे. तसंच रोहित शर्माने या खेळपट्टीवर अर्धशतक ठोकल्याबद्दल कौतुकही केलं.
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने तर ही खेळपट्टी भयानक असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेत खेळाला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे पण खेळाडूंनी न्यूयॉर्कमधील अशा वाईट खेळपट्टीवर खेळणं अस्विकार्य आहे. तुम्ही वर्ल्डकपमध्ये जागा बनवण्यासाठी इतकी मेहनत करा आणि तुम्हाला अशा खेळपट्टीवर खेळावं लागतं, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.