T20 Final India vs South Africa: आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत टी-20 विश्व चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला. भारताने अंतिम क्षणी दक्षिण आफ्रिकेच्या हातातील विजय हिसकावून घेतला. या पराभानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्कराम (Aiden Markram) याने स्पर्धेत संघाने केलेल्या चांगल्या कामगिरींकडे आपण कधीतरी पाहू शकतो, पण सध्या फक्त वेदना होत आहेत अशा भावना व्यक्त केल्या. या वेदना पुढच्या वेळी जोश भरण्यात उपयोगी पडतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलेलं असताना संघाला शेवटच्या क्षणी 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. हेनरिक क्लासेन याने 27 चेंडूत 52 धावा ठोकत संघाला विजय हातात आणून दिला होता. पण तळाच्या फलंदाजांनी तो आक्रमकपणा न दाखवल्याने प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज असतानाही त्यांना 7 धावांनी पराभव स्विकारावा लागला. 


जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांच्या गोलंदाजीसह सूर्यकुमार यादव यानेही जबरदस्त झेल घेतल विजयात मोलाचा वाटा उचलला. तसंच विराट कोहलीने 76 धावांची खेळी करत भारतीय फलंदाजीत मोठं योगदान दिलं. कर्णधार मार्कराम यानेही सामन्यानंतर भारतीय संघाचं कौतुक केलं. "हा क्रिकेटचा पहिलाच सामना नाही, जेव्हा संघाला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. भारताने चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करत संघाला मजबूत स्थितीत नेलं," असं त्याने म्हटलं.


पराभवाबद्दल वाईट वाटत असलं तरी मार्कराने आपल्याला आपल्या संघातील खेळाडूंवर गर्व असल्याचं म्हटलं आहे. त्याने म्हटलं की, "एक गोष्टी मी निश्चितपणे सांगू शकतो की आम्हाला फार गर्व आहे. फक्त आमच्या खेळावर नाही तर संपूर्ण स्पर्धा आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या तयारीवर".


मार्करामने सांगितलं की, मागे वळून पाहताना या स्पर्धेतील अनेक चांगल्या गोष्टीही दिसतात. जसं मी म्हटलं की, थोडंसं मनात टोचत आहे, पण हे चांगलं आहे. यामुळे पुढील वेळी चांगली कामगिरी करण्याची ऊर्जा मिळेल. दरम्यान यावेळी त्याने क्लासेनने इतके प्रयत्न केले असतानाही या निकालावर समाधान मानणं त्याच्यासाठी फार कठीण असेल असं मान्य केलं. 


मार्करामने यावेळी भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं. तो म्हणाला की, "हे क्रिकेट आहे. हे कठीण क्रिकेट असून ट्रॉफी जिंकणं सोपी गोष्ट नाही. तुम्हाला यासाठी भारताला सलाम करावा लागेल. यासाठी खूप मेहनत लागते".