T20 World Cup 2022: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झालीय. पण स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झालाय. अशात संघात त्याची जागा कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहच्या जागी एक घातक गोलंदाज जागा घेऊ शकतो. कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. टीम इंडियाचा अनुभवी आणि भेदक गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात समावेश होऊ शकतो. मोहम्मद शमी आता पूर्णपणे फिट होत असून जसप्रीत बुमराहची जागा घेण्यासाठी तो सज्ज आहे. 


टी20 वर्ल्ड कपसाठी (Team India) घोषित करण्यात आलेल्या संघात राखीव खेळाडू म्हणून मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनाची (Corona) लागण झाल्याने मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) मालिकेत खेळू शकला नव्हता. बीसीसीआयने (BCCI) अद्याप शमीच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण कोच द्रविडने शमी या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचा दावा केला आहे. असं असलं तरी दीपक चाहर (Deepak Chahar) आणि मोहम्मद सिराजही (Mohammed Siraj) या जागेवर दावा करु शकतात.


T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया- 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, बी. कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.


स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर