Kapil Dev Hails Rohit Sharma: भारतीय संघ मागील 11 वर्षांहून अधिक काळापासूनचा वर्ल्ड कपचा दुष्काळ संपवण्यापासून केवळ धोन विजय दूर आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आज भारताचा सेमी फायनलचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार असून जिंकणारा संघ 29 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनल खेळेल. असं असतानाच भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. मात्र रोहितचं कौतुक करताना कपिल देव यांनी माजी कर्णधार विराट कोहलीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. 


रोहितची दमदार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ आज म्हणजेच 27 जून रोजी गुआनामधील प्रोव्हीडन्सच्या स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध सेमी-फायनलचा सामना खेळणार आहे. मात्र यापूर्वीच कपिल देव यांनी या सामन्यापूर्वीच रोहितचं कौतुक केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारताने यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ अपराजित राहिला आहे. 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच चाहत्यांचीही कमालीची निराशा झाली होती. भारताने सलग 10 सामने जिंकल्यानंतरही या स्पर्धेतील अंतिम सामना त्यांना जिंकला आला नाही. मात्र हे सारं जुनं विसरुन जाण्याचा सूचक संदेश कपिल देव यांनी दिला असून रोहितचं कौतुक केलं आहे. 


नक्की वाचा >> अखेर दक्षिण आफ्रिकेने Chokers चा ठपका पुसला! T20 World Cup च्या फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री


''विराटलाही ते शक्य नाही''


रोहित शर्माला त्याच्या मर्यादा ठाऊक असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. रोहित शर्माची नेतृत्व करण्याची पद्धत फारच वेगळी असल्याचंही कपिल देव म्हणाले. भारताच्या सर्वाकालीन सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या कपिल देव यांनी रोहित शर्माला संघातील सर्वांना सामाधानी ठेवण्याचं कौशल्य असल्याचं सांगत कौतुक केलं आहे. "त्याला कल्पना आहे की त्याची ताकद काय आहे. ज्यांना आपल्या क्षमतेची कल्पना येते ते लोक थोडं लवकर प्रगती करतात. विराट कोहली 150 ते 250 किलोचं डम्बेल उचलू शकतो. त्याचा अऱ्थ असा नाही की सगळ्यांनाच ते जमेल. रोहित शर्माला त्याच्या क्रिकेटसंदर्भात बरच ज्ञान आहे. तो त्या ज्ञानाचा वापर करुन खेळतो. तो विराट कोहलीसारखा खेळत नाही. विराटसारख्या उड्या मारताना दिसत नाही. मात्र त्याला त्याच्या मर्यादा ठाऊक आहेत. त्याच्या मर्यादांमध्ये राहून त्याच्याइतकी उत्तम कामगिरी कोणीच करु शकत नाही. अगदी विराटलाही हे शक्य नाही," असं कपिल देव यांनी 'एबीपी न्यूज'शी बोलताना सांगितलं.


नक्की पाहा >> 'आपको अपना दिमाग...', रोहित शर्मा इंझमामवर भडकला; बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवरुन झापलं


"अनेक मोठे खेळाडू केवळ..."


"मोठे खेळाडू हे उत्तम कर्णधार असतीलच असं नाही. सचिन तेंडुलकर, रिचर्डस हेडली यांच्याहून उत्तम कोणीच नाही. मात्र त्यांना कर्णधारपद नव्हतं संभाळायचं. काही खेळाडूंना कर्णधारपद त्यांच्याकडे असेल तर समाधान मिळतं. मात्र यासाठी बराच त्याग करावा लागतो. जसं धोनीने फार त्याग केला होता. धोनीने तरुणांना संधी दिली. विजयी धावा करण्याची जबाबदारी स्वीकारणे यासारख्या गोष्टी धोनीने केल्यात. रोहितचं काय तो एवढा सरळ आणि सुटसुटीत विचार करणार असेल असं आधी वाटलं नव्हतं," असं कपिल देव म्हणाले.


नक्की पाहा >> बापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाच


"आमच्या पर्यंत ज्या गोष्टी पोहचल्या आहेत त्यानुसार तो ड्रेसिंग रुममध्ये सर्वांना फार आपलसं करुन घेतो. अनेक मोठे खेळाडू केवळ स्वत:साठी खेळतात. ते कर्णधारपद सुद्धा स्वत:साठी श्वीकारतात. मात्र यामुळेच रोहितच्या नावासमोर एक फार मोठी उपलब्धी आहे ती म्हणजे त्याला संपूर्ण संघाला समाधानी ठेवता येतं," असं कपिल देव म्हणाले. आता यामाधील अनेक मोठे खेळाडू या टीकेचा रोख विराटच्या दिशेने तर नाही ना? अशी चर्चाही सुरु झाली आहे.


भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे 2 कर्णधार


कपिल देव हे भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या दोन कर्णधारांपैकी एक आहेत. त्यांनी कपिल देव यांच्याशिवाय 2007 मध्ये टी-20 चा वर्ल्ड कप आणि 2011 मध्ये एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप महेंद्र सिंह धोनीने जिंकून दिला होता.