Live ENG vs BAN: इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात जिंकण्यासाठी इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने आपला सहा गडी गमावून हा धावांचा डोंगर उभा केला आहे.
लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात जिंकण्यासाठी इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने आपला सहा गडी गमावून हा धावांचा डोंगर उभा केला आहे.
इंग्लड कर्णधार इयॉन मॉर्गन याने टॉस जिंकून बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हस याला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रण दिले.
बांगलादेशची सुरूवात संथ झाली. परिस्थितीचा आढावा घेत तमीमने नंतर आपला नैसर्गिक खेळ केला. त्याने १४२ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांसह १२८ धावांची शानदार खेळी केली. त्याला मुशफिकूर रहिम याने ७९ धावा काढत चांगली साथ दिली. रहिम याने आपल्या खेळी ७२ चेंडूंचा सामना करत ८ चौकार लगावले.
तमीम ४४ षटकात जलदगतीने धावा काढण्याच्या नादात प्लंकेटच्या गोलंदाजीवर जोरात फटका मारत असताना चेंडू बॅटेची कड घेऊन उंच गेला. त्यात जॉश बटलर याने कोणतीही चूक न करता अचूक झेल पकडला.
इंग्लंडकडून प्लंकेट याने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर बॉल आणि स्ट्रोक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.