KL Rahul : वर्ल्डकप 2023 च्या स्पर्धेत टीम इंडियाचा ( Team India ) पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज के.एल राहुलच्या ( Kl rahul ) उत्तम खेळीच्या जोरावर टीम इंडियाने कांगारूंचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात के.एल राहुलने 5 व्या नंबरवर खेळत 97 रन्सची धडाकेबाज खेळी केली. टीम इंडियाला ( Team India ) विजयासाठी 5 रन्सची गरज होती. यावेळी के.एल राहुलला शतक पूर्ण करण्यासाठी 9 रन्सची गरज होती. या परिस्थितीत एक फोर मारून नंतर 6 लगावत शतक पूर्ण करण्याचा विचार के.एल राहुलने केला. मात्र यावेळी पहिलाच शॉट सिक्स गेल्याने राहुलचं शतक पूर्ण झालं नाही. मात्र राहुलचं शतक पूर्ण न झाल्याचा फटका टीम इंडियाला देखील बसला. 


टीम इंडियाचं झालं मोठं नुकसान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुलचं ( Kl rahul ) शतक पूर्ण न झाल्यामुळे टीम इंडियाचे नुकसान झालंय. आता हे तुम्हाला हे थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. यावेळी राहुलचं शतक न झाल्याने टीम इंडियाला रन रेटमध्ये फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमचं नेट रनरेट 0.883 आहे. पण केएल राहुलने ( Kl rahul ) प्रथम फोर मारून दुसऱ्या बॉलवर सिक्स लगावली असती तर टीमचं नेट रनरेट आणखी सुधारलं. एकंदरीत गणित पाहिल्यास भारताचा नेट रन रेट 0.960 झालं असतं.


निराश झाला के.एल राहुल


शतक पूर्ण न केल्यामुळे केएल राहुल ( Kl rahul ) काहीसा निराश झालेला दिसून आला. विजयी शॉट मारल्यानंतर खेळाडू आनंदी होतो. मात्र तसं न होता राहुलने सिक्स ठोकताच तो निराश झाल्याचं कॅमेरात कैद झालं. त्याच्याकडे पाहून त्याने लगावलेला शॉट सिक्स कसा गेला, यावर त्याच्या विश्वास बसत नव्हता. 


काय म्हणाला के.एल राहुल?


या विनिंग शॉटबाबत बोलताना के.एल राहुल( Kl rahul ) म्हणाला, "शेवटचा फटका मी फार छान मारला. मला फोर आणि सिक्स मारुन शतक झळकावण्य्चा विचार करत होतो. अपेक्षा आहे की, इतर सामन्यांमध्ये मी हे करुन दाखवेन," 


टीम इंडियाचा पुढचा सामना अफगाणिस्तानशी


वर्ल्डकपच्या स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडियाने ( Team India ) जिंकला. तर आता दुसरा सामना टीम इंडियाला अफगाणिस्तानशी खेळायचा आहे. हा सामना बुधवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यावेळी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंवर लक्ष्य राहणार आहे.