मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आलेल्या कर्णधार विराट कोहलीने पुनरागमन केलं आहे. तर टी-२० टीममधून कृणाल पांड्याला डच्चू देण्यात आला आहे. तर धोनीला या सीरिजसाठी देखील संधी देण्यात आली नाही. दुसरीकडे दुखापतीतून सावरत असलेल्या भुवनेश्वर कुमारलादेखील टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये निवडण्यात आलं आहे. ६ डिसेंबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. या दोन्ही टीम ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.


टी-२० टीम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार


वनडे टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार


टी-२० सीरिजचं वेळापत्रक


पहिली टी-२०- ६ डिसेंबर २०१९, मुंबई


दुसरी टी-२०- ८ डिसेंबर २०१९, तिरुवनंतपुरम


तिसरी टी-२०- ११ डिसेंबर २०१९, हैदराबाद


वनडे सीरिजचं वेळापत्रक


पहिली वनडे- १५ डिसेंबर २०१९, चेन्नई


दुसरी वनडे- १८ डिसेंबर २०१९, विशाखापट्टणम


तिसरी वनडे- २२ डिसेंबर २०१९, कटक