श्रीलंकेत होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली-धोनीसोबत ६ खेळाडूंना आराम
टी-२० सीरिज जिंकण्यासोबतच टीम इंडियाचा दोन महिन्यांचा आफ्रिकन दौरा संपला आहे. त्यानंतर आता ६ मार्चपासून तीन देशांची टी-२० ट्राय सीरिज सुरु होत आहे.
नवी दिल्ली : टी-२० सीरिज जिंकण्यासोबतच टीम इंडियाचा दोन महिन्यांचा आफ्रिकन दौरा संपला आहे. त्यानंतर आता ६ मार्चपासून तीन देशांची टी-२० ट्राय सीरिज सुरु होत आहे.
टीमची धुरा रोहित शर्माकडे
श्रीलंकेत होणाऱ्या या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये कॅप्टन विराट कोहलीला आराम देण्यात आला असून टीमची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकाविरोधात शेवटची टी-२० मॅचमध्येही टीमची धुरा सांभाळली. आता श्रीलंका आणि बांगलादेश विरोधात होणाऱ्या या सीरिजमध्ये रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे.
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यान होणाऱ्या टी २० ट्रॉफीतील पहिली मॅच ६ मार्च रोजी होणार आहे. तर शेवटची मॅच १८ मार्च रोजी होणार आहे.
या खेळाडूंना दिला आराम
विराट कोहलीसोबतच महेंद्र सिंग धोनी यालाही आराम देण्यात आला आहे. आगामी दौऱ्यात टीम इंडियातील सहा खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे.
अशी आहे टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुडा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकत, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत