एक यॉर्कर आणि बॅटचे 2 तुकडे, भारतीय गोलंदाजाचा `तो` Video आला समोर
पाच टी20 सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेटस राखून पराभव केला.
मुंबई : पाच टी20 सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेटस राखून पराभव केला. या सामन्यात अनेक किस्से घडले. ईशान किशनची धमाकेदार बॅटींग, ऋषभ पंत डायमंड डकचा व्हिडिओ त्यानंतर दक्षिण आफ्रिकन खेळाडूची बॅट तुटल्याचा प्रसंग, या सर्व घटनेने पहिला सामना खुप चर्चेत राहीला. भारताच्या गोलंदाजाने केलेली वेगवान गोलंदाजी आणि आफ्रिकन खेळाडूची बॅट तुटल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात संधी मिळाली होती. या संधीचे सोने करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आवेश खानला खास काही कामगिरी करता आली नाही. या सामन्यात आवेश खानने 4 षटकात 35 धावा दिल्या. आवेश खानला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. मात्र तरीही त्याच्या बॉलिंगची चर्चा संपूर्ण सामन्यात झाली.
व्हिडिओत काय?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आवेश खान 14 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये त्याने तिसरा चेंडू इतका वेगात टाकला की आफ्रिकेचा फलंदाज रॅसी व्हॅन डर ड्युसेनची बॅट त्याचा सामना करू शकली नाही आणि बॅटीचे दोन तुकडे झाले. आपल्या बॅटची अशी अवस्था पाहून रासी व्हॅन डर ड्युसेन थक्क झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आवेश खान 140 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. त्याने थेट यॉर्कर टाकला आणि यामध्ये फलंदाजाची बॅट तूटली. या घटनेनंतर रॅसी व्हॅन डर ड्युसेनला त्याची तुटलेली बॅट बदलावी लागली. या सामन्यात आवेश खानला खास काही कामगिरी करता आली नाही मात्र या घटनेने त्याची बॉलिंग चर्चेत राहीली.