IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, मुंबईकर खेळाडू बाहेर!
IND vs NZ ODI Series : भारत आण न्यूझीलंडमधील वनडे मालिका उद्यापासून सुरू होत आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईकर खेळाडू बाहेर झाला आहे.
IND vs NZ ODI Series 2023 : भारत आण न्यूझीलंडमधील वनडे मालिका उद्यापासून सुरू होत आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyash Iyer) पाठीच्या दुखण्यामुळे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रेयसच्या जागी संघात रजत पाटीदारला (Rajat Patidar) स्थान मिळालं आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. (Team India batter Shreyas Iyer has been ruled out of the upcoming 3-match ODI series against New Zealand latets Marathi Sport News)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात उद्यापासून म्हणजे 18 जानेवारीपासून हैदराबाद येथे होणार आहे. जर या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केले. तर आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया नंबर वन होण्याची संधी आहे.
2022 मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये श्रेयस भारताकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू राहिला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये 3 सामन्यात श्रेयसने 31.33 की सरासरी ते 94 धावा केल्या होत्या.
सध्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ 117 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया 110 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात टीम इंडियाने क्लीन स्वीप केले तर टीम इंडियाचे 114 गुण होतील आणि न्यूझीलंडचा संघ 111 गुणांवर घसरेल. परिणामी टीम इंडियाला वनडेमध्ये नंबर वन मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थिती भारत आणि न्यूझीलंड हा सामना जिंकायचा आहे.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक