Team India Head Coach : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून लवकरच टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची  (Team India Head Coach) घोषणा केली जाईल. याची संपूर्ण प्रक्रियाही जवळपास पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरची (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागू शकते. बीसीसीआयने गौतम गंभीरची मुलाखतही घेतलीय. पण आता एक नवी माहिती समोर आली आहे. गौतम गंभीरबरोबरच बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी आणखी एका दिग्गज क्रिकेटरची मुलाखत घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे तो क्रिकेटर
गौतम गंभीरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत झाली. पण गंभीरबरोबरच बीसीसीआच्या क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटीने मंगळवारी माजी भारतीय क्रिकेटर वुरकेरी वेंकट रमन (Woorkeri Raman) यांचीही मुलाखत घेतली अशी माहिती आहे. पण सध्या तरी गौतम गंभीर या शर्यतीत आघाडीवर आहे. पण रमनही यांची दावेदारीही मजूबत असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमन यांनी चांगलं प्रेजेंटेशन सादर केलंय. आता बुधवारी परदेशी उमेदवारांच्या मुलाखत होतील.


परदेशी खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश आहे याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. दरम्यान बीसीसीआयकडून नव्या निवड समितीचीही तपासणी सुरु आहे. यासाठी देखील काही उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. या उमेदवारांची लवकरच मुलाखत होईल. 


राहुल द्रविड यांचा कार्यकाळ
टीम इंडियाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या राहुल द्रविड हे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपेल. द्रविड यांनी दुसऱ्यांदा प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेला नाही. सलग दोन टर्म राहुल द्रविड यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. 


गौतम गंभीरच्या अटी मान्य
सध्या तरी गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे. गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या होत्या. या अटी बीसीसीआयने मान्य केल्या आहेत. कोचिंग स्टार आपल्या मर्जीने व्हावा अशी अट गंभीरने ठेवली आहे. याशिवाय गंभीर संघातही काही महत्त्वपूर्ण बदल करु शकतो. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ जुलै 2024 ते डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. एकदिवसीय, टी20 आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे संघ असावेत अशी अटही गौतम गंभीरने ठेवली आहे. ही अटही बीसीसीआयने मान्य केल्याचं सांगितलं जात आहे.