IND vs AUS 1st ODI : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार टीम इंडियाचा फलंदाज के.एल राहुल ठरला आहे. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने आजच्या सामन्यात विजय मिळवला.


टीम इंडियाच्या फलंदाजांची उत्तम गोलंदाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय भारतासाठी फायद्याचा  ठरला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेली ऑस्ट्रेलिया टीम 35.4 ओव्हरमध्ये 188 रन्स करून ऑलआऊट झाली. यावेळी मोहम्मद शमीने 3 आणि मोहम्मद सिराजने 3 विकेट्स काढले होते. तर रविंद्र जडेजा 2, हार्दिक आणि कुलदीपने 1-1 विकेट्स घेतल्यात.


टीम इंडियाचा विजय


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे सिरीज सुरु असून टीम इंडियाने या सिरीजची सुरुवात विजयाने केली आहे. 189 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 39 रन्सवर टीम इंडियाचे 4 प्रमुख खेळाडू माघारी परतले होते. सामन्यामध्ये एक वेळ अशी आली होती की, टीम इंडिया सामना हरेल असं वाटत होतं. मात्र त्यावेळी एका बाजूने केएल राहुलने डाव सांभाळला आणि टीमला विजय देखील मिळवून दिला. 


के.एल राहुलचं शानदार अर्धशतक


गेल्या अनेक दिवसांपासून केएल राहुलवर त्याच्या खराब खेळामुळे अनेक टीका करण्यात आल्या. यानंतर टेस्ट क्रिकेटमधून त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेऊन त्याला टीममधून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र आजच्या सामन्यात के.एल राहुलने उत्तम अर्धशतक खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 


या सामन्यात के.एल राहुलने 91 बॉल्समध्ये 75 रन्सची मॅचविनिंग नाबाद इनिंग खेळूली. यावेळी त्याला रवींद्र जडेजाने साथ दिली आणि त्याने 69 बॉल्समध्ये 45 रन्सची शानदार नाबाद खेळी खेळली.