मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात बुधवारी सामना रंगला होता. या सामन्यात प्रेक्षकांना असं काही पाहायला मिळालं, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. या सामन्यादरम्यान, मोठ्या स्क्रीनवर व्हर्च्युअल गेस्ट बॉक्स दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये आयपीएल प्रायोजकांचं काही गेस्ट म्हणजे पाहुणे दाखवले जात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हर्च्युअल गेस्ट बॉक्समध्ये चाहत्यांना दिसला तो टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा. गेल्या वर्षापर्यंत आयपीएल खेळत असलेला भारतीय गोलंदाज इशांत शर्मा इतरांसोबत व्हर्च्युअल गेस्ट बॉक्समध्ये दिसला. त्याला या भूमिकेत पाहून चाहते खूपच निराश झाले आहेत. इशांत व्हर्चुअल गेस्ट बॉक्समध्ये बसल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.


आयपीएलच्या मेगा ऑक्शन इशांत शर्माची बेस प्राईज दीड कोटी रुपये होती. मात्र कोणत्याही टीमने त्याला खेरेदी केलं नाही. 2019 मध्ये, त्याला दिल्ली कॅपिटल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले आणि तीन वर्षांसाठी तो दिल्लीच्या टीमचा भाग होता.



2008 मध्ये कोलकाताकडून पदार्पण करणाऱ्या इशांतने आयपीएलमध्ये 93 सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याने 8.11 च्या इकॉनॉमीने त्याने 72 विकेट्स घेतल्या आहेत. 12 रन्स देत 5 विकेट्स घेण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.


इशांत शर्माला सध्या टीम इंडियामध्येही जागा मिळत नाहीये. फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी त्याला स्थान देण्यात आलं नव्हतं.