WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने 2 वेळा धडक दिली असून एकदाची विजय मात्र मिळवता आला नाही. 2021 आणि 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवचा सामना करावा लागला होता. अशातच आता टीम इंडियाने आगामी म्हणजेच 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तयारी सुरु केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WTC 2025 च्या साखळीला सुरुवात झाली असून वेस्ट इंडिजविरूद्ध खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या सिरीजमध्ये एका सामन्यात टीमला विजय मिळवणं शक्य झालं होतं. तर दुसरा सामना ड्रॉ झाला होता. या सिरीजनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) टीम इंडियाने अव्वल स्थान गाठलं होतं. 


बांगलादेशाकडून टीम इंडियाला धक्का


भारत आणि वेस्टइंडिज यांच्या टेस्ट सिरीजनंतर पाकिस्ता विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 2 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात आली होती. यामध्ये पाकिस्तानने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) पहिलं स्थान पटकावलं. तर आता नुकत्याच सुरु असलेल्या बांगलादेश विरूद्ध न्यूझीलंड यांच्या सिरीजमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 


बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडिया WTC Points Table मध्ये दुसऱ्या स्थानावर होती. मात्र न्यूझीलंडच्या टीमचा पराभव करून बांगलादेशने पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. टीम इंडिया आता पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलीये. बांगलादेशने पॉइंट टेबलमध्ये केलेल्या बदलांमुळे भारताला मात्र मोठा धक्का बसला असून संपूर्ण समीकरण आता बिघडलं आहे.


दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टेस्ट खेळणार टीम इंडिया


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त 2 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळली आहे. यानंतर आता आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 2 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळणार आहे. या सिरीजसाठी नुकतंच बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा देखील केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी ही सिरीज महत्त्वाची मानली जातेय.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) टॉप 2 वर असलेल्या टीम फायनलमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला टॉप 2 मध्ये येणं गरजेचं आहे.