T20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर Rohit Sharma ला हटवणार? आता नव्या मिशनची तयारी?
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच Rohit Sharma चे नवे फोटो आले समोर, हिटमॅन नव्या मिशनच्या तयारीत?
Rohit Sharma Team India : टी20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket) खळबळ माजली आहे. बीसीसीआयने (BCCI) गंभीर पावलं उचलत शुक्रवारी निवड समितीच (Selection Committee) बरखास्त केली. त्यानंतर नविन अर्ज मागवण्यात आले आहेत. बीसीसीआयने काल यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे. इतकंच नाही तर क्रिकेटच्या तीन फॉर्मेटासाठी तीन कर्णधार नियुक्त करण्यावरही बीसीसीआयचा विचार सुरु आहे. त्यामुळे टी20 फॉर्मेटमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपद गमवावं लागण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माने शेअर केले नवे फोटो
दरम्यान, टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा पहिल्यांचा समोर आला आहे. रोहित शर्माने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले असून हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. मैदानावर कसून सराव करत असतानाचे फोटो रोहित शर्माने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रोहित शर्मा रनिंग आणि व्यायाम करताना दिसत आहे. रोहित शर्माच्या या फोटोंना इन्स्टाग्रामवर लाखो लोकांनी लाईक केले आहेत. पण कर्णधारपद सोडण्याच्या चर्चेमुळे त्या फोटोंना महत्व प्राप्त झालं आहे.
रोहित शर्माचा न्यूझीलंड दौऱ्यातून ब्रेक
रोहित शर्मा टीम इंडियाच्या तीनही फॉर्मेटचा कर्णधार आहे. पण न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याने ब्रेक घेतला आहे. रोहित शर्मा बांगलादेशमध्ये होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी सीरिजमध्ये खेळताना दिसणार आहे.
रोहित शर्माला टी20 कर्णधारपदावरुन हटवणार?
टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर निवड समिती बरखास्त करण्यात आली. त्यानंतर रोहित शर्माचीही उचलबांगली होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माची स्वत:ची कामगिरीही समाधानकार झाली नव्हती. तसंच त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियालाही सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला होता.
तीन फॉर्मेटसाठी दोन कर्णधार
क्रिकेटच्या तीन फॉर्मेटसाठी म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटासाठी तीन कर्णधार निुयक्त करण्याचा बीसीसीआय विचार करु शकतं. म्हणेज टी20 संघाची धुरा दुसऱ्या खेळाडूवर सोपवली जाऊ शकते. तर रोहित शर्माकडे कसोटी आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद कायम ठेवलं जाऊ शकतं.
दरम्यान, या सर्व चर्चा आहेत. गेल्या वर्षी टी20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. रोहितच्या नेतृत्वात भारताने दुहेरी मालिका जिंकल्या. पण एशिया कप आणि टी20 वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये पराभव स्विकारावा लागला.