मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी दु:खाद बातमी आहे. सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या सामन्यापूर्वी कोहलीनं आपल्या जवळची खास व्यक्ती गमवली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे बालपणीचे कोच सुरेश बत्रा यांचं निधन झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. तेव्हा विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा होते. त्याचवेळी सुरेश बत्रा या अकादमीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. विराटला क्रिकेट शिकवणारे सुरेश बत्रा यांनी वयाच्या 53 व्या वर्षी आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. 



वरिष्ट क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्वीटकरून याबाबत माहिती दिली. सुरेशा बत्रा यांनी गुरुवारी सकाळी पूजा केली आणि अचानक खाली कोसळले. विराट कोहलीचे बालपणीचे कोच होते. त्यांच्या निधनानं क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. राजकुमार शर्मा यांनी आपला छोटा भावू हरपल्याची भावना व्यक्त करत ट्वीटवर श्रद्धांजली वाहिली आहे.


विराट कोहलीला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यात आणि उत्तम फलंदाज म्हणून घडवण्यात राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा यांचा सिंहाचा वाटा आहे. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 91 कसोटी, 254 वन डे आणि 90 टी -20 सामने खेळले आहेत. कोहलीने कसोटीत 7490 धावा, वन डे सामन्यात 12169 धावा आणि टी -20 मध्ये 3159 धावा केल्या आहेत.