मुंबई : क्रिकेट विश्वातून (Cricket) मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Team India Captain Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021 ) कॅप्टन्सी सोडणार आहे. स्वत: विराटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे विराटनंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. ( team india captain virat kohli step down from captaincy after t 20 world cup 2021)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विराटची कर्णधार म्हणून वनडे आणि टी 20तील आकडेवारी


विराटने आतापर्यंत 95 एकदिवसीय आणि 45 टी 20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय. भारताला विराटने या 95 वनडे सामन्यांपैकी 65 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर 27 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.  उर्वरित 1 सामना हा टाय झाला.  2 सामन्यांचा निकाल हा लागलाच नाही. विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला 45 पैकी 29 मॅचमध्ये विजयी केलं. तर 29 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने अस्मान दाखवलं. वनडेप्रमाणेच टी 20 मध्येही 2 मॅचेसचा निर्णय लागला नाही.  
  
कर्णधार म्हणून विराटची आयपीएलमधील कामगिरी


विराट आयपीएलमध्ये बंगळुरुची कॅप्टन्सची जबाबदारी सांभाळतो. विराट 132 मॅचेसमध्ये कॅप्टन्सी केली आहे. यामध्ये बंगळुरुचा विजयापेक्षा पराभवच जास्त झाला आहे. विराटने 62 सामन्यात विजय मिळवून दिलाय. तर 66 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. विराटला आतापर्यंत बंगळुरुला स्वत:च्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकवून देता आलेली नाही. त्यामुळे विराटवर टीकेची झोड उठवली जाते.