मुंबई : टीम इंडियाच्या नव्या कोचचा फैसला 10 जुलैला होणार असल्याचे संकेत सीएबीचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीशी झालेल्या कथित वादानंतर अनिल कुंबळेनं कोचपदाचा राजीनामा दिलाय. या वादावर आणि नव्या कोचबाबत अधिक बोलण्यास गांगुलीनं नकार दिला आहे. 


टीम इंडियाच्या कोचचं पद सध्या रिक्त असून सचिन तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण हे तिघे नव्या कोचची निवड करणार आहेत. 


बीसीसीआयची सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता


बीसीसीआयची सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा दिलेल्या राजीनाम्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या सभेत मुख्य अंजेड्यावर एक राज्य, एक मत आणि पाच सदस्यीय टीम सिलेक्शनची नियुक्ती असणार आहे.


दरम्यान, राज्यसंघटनांच्या प्रतिनिधीनीं रविवारी सीओएची भेट घेतली. यावर लोढा समितीच्या शिफारशींवर चर्चा केली गेली. दरम्यान, श्रीनिवासन या नी रविवारी बैठकीला हजेरी लावल्यानं काही सदस्य नाराज आहेत. आता या बैठकीत कोणते नवे निर्णय होतात याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.