मुंबई :  मुंबईकर अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियात (Indian Cricket Team) कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय. या दरम्यान रहाणेला मोठी गुडन्यूज मिळाली आहे. रहाणेला टी 20 संघाचं कर्णधार (Captaincy) करण्यात आलं आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाने (Mumbai Cricket Board) ही घोषणा केली आहे. रहाणेने आपल्या नेतृत्वात दलीप ट्रॉफीचं (Duleep Trophy)  विजेतेपद मिळवून दिलं. आता रहाणे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) मुंबईचं नेतृत्व करणार आहे. (team india cricketer ajinkya rahane lead mumbai in syed mushtaq ali trophy prithvi shaw and shardul thakur in squad)


शार्दुल आणि पृथ्वी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणेने भारतासाठी 82 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच त्याला कॅप्टन्सीचा अनुभव आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना खूप शिकायला मिळत आहे. पृथ्वी आणि इतर युवा खेळाडूंना त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. टीममध्ये युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी खेळाडूची गरज असते. यावेळेस रहाणे टीममध्ये आहे. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे", असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य निवडकर्ता सलील अंकोला यांनी सांगितले.  


अशी आहे टीम मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, पृथ्वी शॉ, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुश कोटियन, हार्दिक तमोर, प्रशांत सोलंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, शिवम दुबे, अमन खान, साईराज पाटील आणि मोहित अवस्थी.