सिडनी : भारतीय क्रिकेट टीमने ७१ वर्षांचा रेकॉर्ड मोडत ऑस्ट्रेलियामध्ये पहल्यादा टेस्ट सिरीज जिंकली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला. पण पावसामुळे हा सामना ड्रॉ झाला. ४ सामन्यांची सिरीज भारताने २-१ ने जिंकली. भारताने पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्या नावे केली. भारताने २०१७ मध्ये घरच्या मैदानावर २-१ ने ही सिरीज जिंकल ही ट्रॉफी जिंकली होती. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियांना अनोख्या पद्धतीने विजयाचं सेलिब्रेशन केलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट आणि कंपनी ७१ वर्षांचा रेकॉर्ड मोडत ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज जिंकणारी पहिली आशियाई टीम बनली आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा १९४७-४८ मध्ये लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हा त्यांचा सामना सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या ऑस्ट्रेलिया टीमसोबत झाला होता. तेव्हापासूनचा विजय मिळवण्याचा प्रवास विराट कोहलीने ही सिरीज जिंकून संपवला. विराटने हा क्षण खूप सन्मानजनक असल्याचं म्हटलं आहे.



टीम इंडियाने एका वेगळ्या अंदाजात विजयाचा आनंद लूटला. विराट कोहली आणि टीमने मैदानावर डान्स केला. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं. सध्या हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


भारतीय टीम आता इंग्लंडमध्ये होणाऱ्य़ा २०१९ च्या वर्ल्डकपच्या तयारीला लागणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १२ जानेवारीपासून ३ वनडे सामन्यांची खेळणार आहे.