मुंबई : टीम इंडियाचा भक्कम मार्गदर्शक आणि आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनी याच्या विषयी, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टनने मोकळ्या मनाने वास्तव मांडलं आहे. 


आजही धोनीचं मार्गदर्शन महत्वाचं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट टीम इंडियाचा कॅप्टन असला, तरी टीम इंडियाला आजही धोनीचं मार्गदर्शन महत्वाचं वाटतं हे नाकारता येत नाही. क्रिकेट जगतात याविषयी अनेकवेळा चर्चा रंगत आल्या आहेत. विराटने देखील यापूर्वी धोनीचं संघातील स्थान आणि योगदान नाकारता येणार नसल्याचं म्हटलं आहे.


वास्तवाच्या आधारावर धोनीचं कौतुक


गिलख्रिस्टने पीटीआयला एक मुलाखत दिली आहे, यात त्याने वास्तवाच्या आधारावर धोनीचं कौतुक केलं आहे. गिलख्रिस्ट म्हणतो, धोनीची मैदानातली उपस्थिती टीम इंडियाला एक प्रकारची उर्जा देते, यात टीम इंडियात जिंकण्याची धमक निर्माण होते.


धोनी टीम इंडियाविषयी जेवढा सकारात्म विचार करतो, तोच विचार टीम इंडियाला जिंकण्याच्या अधिक जवळ घेऊन जातो, आणि धोनी हे आपले विचार घेऊन मैदानात उभा ठाकल्यामुळेच शक्य होते.


मॅच ओढून आणण्याची क्षमता


महेंद्रसिंह धोनी हा असा क्रिकेटर आहे, ज्यात पहिल्यानंबर पासून सातव्या क्रमांकावरही, यात कुठेही कोणत्याही कठीण परिस्थितीत सांगा, मॅच ओढून आणण्याची क्षमता आहे, आणि ती वेळोवेळी दिसून आली आहे.


विराट कोहली आक्रमक फलंदाज पण


विराट कोहली हा टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आहे, त्याची आक्रमकता सर्वांना आकर्षित करते, आणि समोरील टीममध्ये धडकी निर्माण करते, टीम इंडिया लवचिक असल्याने पर्यायही तेवढे आहेत, मला धोनीची आकडेवारी निश्चित माहित नाही, पण जेव्हा टीमला गरज असते, तो क्षमता दाखवून देतो.


२०१९ च्या वर्ल्डकपमध्येही धोनी असेल


टीम इंडियात सध्या तरी धोनीची जागा कुणी घेईल, असं वाटत नाही, २०१९ च्या वर्ल्डकपमध्येही धोनी टीम इंडियाच्या संघात असेल, असं गिलख्रिस्टने म्हटलं आहे.