INDW vs AUSW: वर्ल्डकपचा हा सामना आम्ही...; Jemimah Rodrigues च्या `त्या` वक्तव्याने खळबळ
आता जेमिमाने असं एक विधान केलंय ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसलाय. सामन्यापूर्वी अंजुम चोप्रा यांच्याशी बोलताना जेमिमाने एक वादग्रस्त विधान केलं आहे.
INDW vs AUSW: टी-20 वर्ल्डकप 2023 मध्ये (Women T20 World Cup) भारतीय महिला टीमची खेळाडू जेमिमा रोड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरूद्ध उत्तम खेळी करत तिने सर्व चाहत्यांचं मन जिंकून घेतलंय. मात्र आता जेमिमाने असं एक विधान केलंय ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसलाय. सामन्यापूर्वी अंजुम चोप्रा यांच्याशी बोलताना जेमिमाने एक वादग्रस्त विधान केले आहे.
Jemimah Rodrigues च्या वक्तव्याने सर्वांना धक्का
सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टीम इंडियाला अष्टपैलू पूजा वस्त्राकरच्या रूपाने मोठा धक्का बसला. ICC ने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, पूजा आजारी असल्याने अशा परिस्थितीत त्याच्या स्नेह राणाला टीममध्ये समाविष्ट करण्यात आलंय. ती दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियासोबत अतिरिक्त राखीव खेळाडू म्हणून उपस्थित होती.
याच प्रकरणाचा संदर्भ देताना जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली की, पूजाचे टीम बाहेर असणं दुर्दैवी आहे. ती मैदानात नसून ती आमच्यासोबत आहे. आम्ही हा सामना तिच्यासाठी आणि एकमेकांसाठी खेळू. आम्ही सर्व मिळून जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
दरम्यान तिच्या या वक्तव्यात जेमिमा रॉड्रिग्सने, ती देशासाठी खेळण्यासाठी उतरली आहे, असं म्हटलं नाही. ज्यावर अनेक चाहत्यांनी आक्षेप घेतला असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
टीम इंडियाची प्लेईंग 11
शेफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंह
ऑस्ट्रेलिया प्लेईंग 11
एलिसा हीली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एश्ले गार्डनर, एलिस पेरी, ताहली मॅक्ग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेयरहम, जेस जोनासेन, मेगन शुट्ट, डार्सी ब्राउन