मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने शानदार कामगिरी करत यजमान भारताला 227 धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लिश संघ कसोटी चँपियनशिप टेबलमध्ये अव्वल स्थानी गेला. या पराभवानंतर भारत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघ दुसर्‍या डावात फक्त 192 धावांवर करु शकला. इंग्लंडने 420 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 227 धावांनी त्यांनी सामना जिंकला. या पराभवामुळे टीम इंडियाला आता पुढच्या सामन्यांमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.


इंग्लंड विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता तर इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. आता ते उलट झाले आहे. इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे कसोटी स्पर्धेत विजयाची टक्केवारी 70.1 आहे. न्यूझीलंडचा संघ 70 टक्के विजयांसह दुसर्‍या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 69 टक्के विजयांसह तिसऱ्या तर भारतीय संघ 68 टक्के विजयांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे.


ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा पुढे ढकलल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाचा फायदा झाला. न्यूझीलंड कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका संपल्यानंतर अंतिम फेरीसाठी दुसरा संघ निश्चित होईल. अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या लॉज्स येथे खेळला जाणार आहे.