लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झालीय. आज भारताचा न्युझीलंडविरुद्ध सराव सामना आहे. तत्पूर्वी झालेल्या ट्रेनिंग सेशनला युवराज यांची अनुपस्थिती होती. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग आजारी आहे. त्यामुळे या सराव सामन्यात युवराज खेळणार नाही.


एक दोन दिवसात युवराज फिट होईल अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे. 4 जूनला एजबॅस्टनवर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. मात्र या प्रॅक्टिस मॅचच्या निमित्ताने कमबॅक करणा-या आर.अश्विनचा फिटनेस तपासण्याची संधी भारताला मिळणार आहे.