T20 World Cup: भारतीय संघात `या` खेळाडूंची जागा निश्चित, या तारखेला होणार घोषणा!
टी 20 विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 2022 च्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे आहे.
Team India For T20 World Cup: टी 20 विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 2022 च्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे आहे. T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, सर्व संघांना त्यांच्या संघांची यादी आयसीसीकडे सादर करावी लागेल. 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची तयारी जोरात सुरू आहे. या विश्वचषकासाठी संघाची घोषणा 15 सप्टेंबरपर्यंत होऊ शकते. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, प्रत्येक संघाला 15 सप्टेंबरपर्यंत आयसीसीकडे आपला संघ सादर करावा लागेल, असं सांगण्यात आलं आहे.
या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला 4 टी-20 मालिका खेळायच्या आहेत. या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारेच टीम इंडियाची घोषणा केली जाईल. 15 सप्टेंबरपूर्वी भारताला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आणि एक आशिया कप खेळायचा आहे. अलीकडेच, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टॉप 15-20 खेळाडूंची यादी तयार होईल.
2022 च्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या काही खेळाडूंची नावे समोर येत आहेत. या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल रोहुल आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. यावेळी 2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल. गेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब होती.