मुंबई : टीम इंडिया टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) आधी ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकाशी भिडणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचं (Team India)  लक्ष आता या दोन्ही संघाच्या सामन्यावर असणार आहे.या दरम्यानचं एका स्टार खेळाडूने दोनदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.त्यामुळे नेमका हा खेळाडू कोण आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 टी20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर अनेक खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चैन्नई सुपर किंग्ज संघातील दोन खेळाडूंची नावे चर्चेत आली होती. ईश्वर पांडे आणि रॉबिन उथप्पा. यामधील रॉबिन उथप्पाने दोनदा लग्न केले होते. दोनदा लग्न करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश काय होता तो जाणून घेऊयात.  


गेली अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 36 वर्षीय रॉबिन उथप्पाने (Robin  Uthappa) 3 मार्च 2016 रोजी शीतल गौतमशी लग्न केले होते. शीतल गौतम आणि रॉबिन हे बंगळुरूमध्ये एकाच कॉलेजमध्ये होते. शीतल या कॉलेजमध्ये रॉबिन उथप्पाची सिनियर होती. दोघेही सात वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2016 मध्ये ते लग्न बंधनात अडकले होते.  


धनश्री वर्माने दिली गुड न्यूड, इन्स्टाग्राम पोस्ट करत केली मोठी घोषणा


शीतल गौतमही (Sheetal Goutham) क्रीडा पार्श्वभूमीतून आली आहे. शीतल यापूर्वी टेनिसपटू राहिली आहे. तिने वयाच्या 9 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली होती. शीतलचा भाऊ अर्जुन गौतम हा देखील टेनिसपटू राहिला आहे.


शीतल गौतम (Sheetal Goutham)  ही हिंदू धर्मीय आहे, तर उथप्पा हा ख्रिश्चन कुटुंबातून येतो. अशा परिस्थितीत दोघांनी 3 मार्च 2016 रोजी आधी ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले. आणि एका आठवड्यानंतर 11 मार्च 2016 रोजी दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. अशाप्रकारे दोघे दोनदा लग्न बंधनात अडकले होते.  


रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि शीतल गौथम (Sheetal Goutham)  ऑक्टोबर 2017 मध्ये पहिल्यांदा पालक झाले होते. शितलने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ट्रिनिटी थिया उथप्पा असे ठेवले आहे.


दरम्यान रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) नुकतीच सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.