IND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर...
Rahul Dravid gave batting tips to Washington Sundar: क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे.
India vs Bangladesh 3rd ODI: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवाची चव चाखल्याने भारताने वनडे सिरीजही (India vs Bangladesh ODI Series) गमावली. अशातच आता अखेरचा सामना जिंकून मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया (Team India) मैदानात उतरेल. अशातच आता तिसऱ्या सामन्याआधी एक व्हिडीओ समोर आला आहे.
क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे. कोच राहूल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली नेटमध्ये घाम गाळताना (Net Practice) दिसते. राहुल द्रविड आपल्या अनुभवाचे डोस युवा खेळाडूंना देताना दिसत आहेत. राहुल द्रविड यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचा सराव करून घेतला. त्यावेळी त्यांनी फलंदाजांना खास टेकनिक देखील शिकवली.
बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात वॉशिंग्टन सुंदर नेटप्रॅक्टिस करताना दिसत आहे. त्यावेळी कोच राहूल द्रविड सुंदरजवळ येतात आणि त्याला मोलाचे सल्ले देतात. राहुल द्रविड या व्हिडीओमध्ये कवर ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह, स्वीप आणि पूल शॉट शिकवताना दिसत आहेत.
पाहा Video -
दरम्यान, सध्या टीम इंडियाचे रोहित शर्मा (Rohit Sharma), कुलदीप सेन (Kuldeep Sen), दीपक चहर (Deepak Chahar) हे खेळाडू जखमी आहेत. त्यामुळे आता अखेरच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर खेळणं संघासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता आगमी सामन्यात टीम इंडियाच्या प्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.