चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईत रविवारी पहिला सामना खेळवला जातोय. यासाठी दोन्ही संघातील क्रिकेटर्स चेन्नई पोहोचलेत. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर याआधीच तेथे पोहोचले होते. आता भारतीय संघातील क्रिकेटरही चेन्नईमध्ये दाखल होतायत. 


भारताचा कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्या हे दोघंही एकाच फ्लाईटमध्ये होते. यादरम्यान हार्दिकने विराटसोबतचा एक सेल्फीही सोशल मीडियावर शेअर केलाय.


दुसरीकडे अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनीही एकाच फ्लाईटमधून प्रवास करताना चेन्नई गाठले. माजी कर्णधार एम एस धोनी आणि रोहित शर्मा आधीपासूनच तेथे होते.