मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सीरिजनंतर आता श्रीलंके विरुद्ध टी 20 आणि कसोटी सीरिज खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका 3 टी 20 तर 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. 24 फेब्रुवारीपासून टी 20 सामने सुरू होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या सामन्याला क्रिकेटप्रेमींना परवानगी असणार नाही. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींना सामना पाहता येणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 पहिला सामना गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. 


पहिला टी 20 सामना लखनऊ इथल्या अटल बिहारी वाजपेयी इकाना अंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर खेळताना दिसणार नाहीत. दुखापतीमुळे ते संघातून बाहेर पडले आहेत. हे सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहेत. याशिवाय हॉटस्टार असलेल्यांना हे सामने OTT वर पाहता येणार आहेत.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार,हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.