U19 World Cup : टीम इंडियाने मिळवलं फायनलचं तिकीट, नव्या छाव्यांनी 2 विकेट्सने उडवला साऊथ अफ्रिकेचा धुव्वा!
Team India Into the Final : साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने (IND vs SA U19 World Cup) फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. सचिन धस (Sachin Dhas) याच्या 96 धावांच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचता आलंय.
IND vs SA Under-19 : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South africa) यांच्यात सेमीफायनल सामना विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाच्या नव्या छाव्यांनी दमदार कामगिरी करत फायनलचं (Team India In Final) तिकीट मिळवलं आहे. उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 5 विजय नोंदवले होते, आता त्याल 6 व्या विजयाची नोंद झाली आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला 245 धावांचं आव्हान मिळालं होतं. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना सचिन धस (Sachin Dhas) याच्या 96 धावांच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला 9 व्यांदा फायनलमध्ये पोहोचता आलंय. टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव केला आहे. (Team India Into the U19 World Cup 2024 Final)
पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी आणि मुशीर खान यांना मोठी कामगिरी करता आली नाही. मात्र, कॅप्टन उदय सहारन पाय खोवून उभा राहिला. त्याला सचिन धस याची मोलाची साथ मिळाली. सचिन धस शतकापासून 4 धावा लांब राहिला. त्याने 96 धावांची खेळी केली. अखेरच्या तीन ओव्हरमध्ये 19 धावांची गरज होती. मात्र, उदयने अखेरपर्यंत झुंज दिली. राज लिंबानी याने विजयी चौकार खेचत फायनलची कवाडं उघडली आहेत.
दक्षिण आफ्रिकेने ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस याच्या 76 धावांच्या खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 244 धावा केल्या होत्या. तर रिचर्ड सेलेट्सवेन याने 64 धावांची भन्नाट खेळी केली. अखेरच्या 10 ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेचं पारडं जड झालं. त्यांन शेवटच्या 60 बॉलमध्ये 81 धावा खोदून काढल्या. त्यामुळे साऊथ अफ्रिकेला 244 धावा करता आल्या. टीम इंडियाकडून राज लिंबानी याने तीन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या. तर नमन तिवारी आणि सौम्य पांडेला 1-1 विकेट मिळाली. तर चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खान याने 2 गडी बाद केले.
टीम इंडिया : उदय सहारन (कॅप्टन), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
दक्षिण आफ्रिका : जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना आणि क्वेना माफाका.