टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळताचं `या` खेळाडूचं मोठ वक्तव्य
टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे.
मुंबई : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेत भारत आणि आफ्रिका 2-2ने बरोबरीत आहेत. उद्या होणाऱ्या सामन्यानंतर या मालिकेवर कोण बाजी मारतोय हे स्पष्ट होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या नवीन कर्णधाराने मोठ विधान केले आहे. त्याचे विधान आता चर्चेत आले आहे.
भारताचा आयर्लंड विरुद्धच्या मालिकेचा कर्णधार हार्दिक पंड्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात चांगलाच फॉर्ममध्ये आहे. हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या चार सामन्यात चांगली फलंदाजी केली. चार सामन्यांमध्ये 58.50 च्या सरासरीने 153.94 च्या स्ट्राइक रेटने 117 धावा केल्या. दिनेश कार्तिकसोबतच्या त्याच्या भागीदारीमुळे संघाला राजकोटमध्ये चौथा T20 जिंकता आला.
हार्दिक पंड्याने त्याच्या करीअरबद्दल मोठा खूलासा केला आहे. तो म्हणतो, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक चांगला खेळाडू बनण्यास कशी मदत केली, याची माहिती दिली. बीसीसीआय़ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. 'जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा माही भाईने मला एक गोष्ट शिकवली. मी त्याला विचारले की तू दबाव कसा हाताळतोस, तेव्हा त्याने मला एक सोपा सल्ला दिला, तुझ्या स्कोरबद्दल विचार करणे थांबवा आणि तुझ्या संघाचा विचार करायला लाग, असा सल्ला त्याने दिल्याचे पंड्याने सांगितले.
आयपीएल कामगिरी
पंड्याने IPL 2022 हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले. जिथे संघाने पहिल्याच हंगामात शानदार विजय नोंदवला. पंड्याने या मोसमात 487 धावा केल्या आणि 8 विकेट्सही घेतल्या. त्याचा हा फॉर्म पाहता त्याला आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामना रविवारी (19 जून) बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याचा विजेता मालिकेवर कब्जा करणार आहे.