मुंबई : भारताचा माजी गोलंदाज जहीर खानचं म्हणणं आहे की, भारताकडे दुखापतीमुळे बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहची जागा भरुन काढण्यासाठी पर्याय आहेत. हे दोघेही गोलंदाज इंग्लंडच्या विरुद्ध 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये दुखापतीमुळे बाहेर राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघासाठी पहिल्या 3 टेस्ट सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकुरला संघात जागा देण्यात आली आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या देखील संघात आहे. बीसीसीआयने म्हटलं आहे की, वनडे सिरीजमध्ये अनफीट असलेला जसप्रीत बुमराह दूसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकतो. 1 ऑगस्टपासून बर्मिंघममध्ये पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे.


भारताची स्ट्रेंथ चांगली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जहीरने एका कार्यक्रमात म्हटलं की, 'बुमराह आणि भुवनेश्वर दुखापतीमुळे संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे. आगामी सामन्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे. पण माझं मत आहे की, जो ही गोलंदाज खेळेल त्याने पुढे येऊन जबाबदारी सांभाळली पाहिजे. उमेश चांगली गोलंदाजी करतोय. ईशांत सीनियर गोलंदाज आहे. मोहम्मद शमीचा रेकार्ड चांगला आहे. भुवनेश्वर आणि बुमराहची कमतरता जाणवेल पण भारताची स्ट्रेंथ चांगली आहे.'


भारत चांगली कामगिरी करतोय


जहीरने म्हटलं की, 'परिस्थिती पाहता मला वाटतं की, भारतीय खेळाडू पाचही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करतील. पाच सामन्यांची सिरीज मोठी आहे. गोलंदाज फीट राहतील अशी आशा व्यक्त करतो. मोठ्या सिरीजसाठी हे महत्त्वाचं आहे की, संपूर्ण टीम फीट असावी.'