IND vs ENG : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला मिळाली `गुड न्यूज`, स्वप्नभंग करणाऱ्या `या` टीमला धक्का!
WTC Points Table : राजकोट टेस्टमध्ये इंग्लंड संघाला (IND vs ENG Rajkot Test) पराभूत करून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या पाईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
World Test Championship points table : भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 434 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. इंग्लंडचा पराभव करून टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील (IND vs ENG Rajkot Test) सर्वात मोठा विजय रोहितसेनेने नोंदवला आहे. रविंद्र जडेजाची (Ravindra jadeja) ऑलराऊड कामगिरी आणि यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal Double Ton) द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. पहिल्या टेस्टमध्ये पराभव स्विकारावा लागल्यानंतर टीम इंडियाने सलग दोन सामने खिशात टाकले. अशातच आता तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर टीम इंडियाला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये (World Test Championship points table) टीम इंडियाने मोठी झेप घेतली आहे.
तिसऱ्या सामन्यातील विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर जाण्यास मदत झाली. सलग दोन विजयानंतर टीम इंडियाने जोरदार मुसंडी मारली. सध्या टीम इंडियाने 7 मॅचमधील 4 विजयामुळे 50 अंक खिशात घातले आहेत. तर अव्वल स्थानी न्यूझीलंडचा संघ विराजमान झालाय. न्यूझीलंडने 4 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. तर एका सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानी आल्याने टीम इंडियाचा स्वप्नभंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलिया 10 सामन्यातील 6 विजयासह तिसऱ्या स्थानी आहे.
टीम इंडियाने 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या 372 धावांचा पराभव करत भारताचा कसोटी क्रिकेटमधील धावांच्या फरकाने त्यांचा सर्वात मोठा विजय होता. आता हाच रेकॉर्ड टीम इंडियाने मोडून काढलाय. तर 1934 मध्ये ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाकडून 562 धावांनी झालेल्या पराभवानंतर हा पराभव इंग्लंडचा कसोटीतील दुसरा सर्वात मोठा पराभव होता.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.