T20 World Cup 2022: गुरुवारच्या दिवशी टी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा प्रवास संपला. सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2022 semifinal) झालेल्या लढतीत इंग्लंडने (England) भारताचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला. त्यामुळे भारताचं (Team India) टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. मात्र आता पुढचा विचार करत भारतीय खेळाडू पुढील दौऱ्यासाठी रवाना झालेत. टीम इंडियाला पुढचा दौरा न्यूझीलंडचा करायचा असून काही खेळाडू त्या दिशेने रवाना झालेत. याच दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा एक फोटो स्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केलीये. ज्यामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल यांचा एअरपोर्टवर एकत्र झोपलेला फोटो शेअर केला आहे. 


या फोटोमध्ये विकेटकीपर पंत सूर्यकुमार यादवच्या मांडीवर झोपताय. तर युझवेंद्र चहल पंतच्या कुशीवर झोपलाय. याशिवाय सूर्यकुमार यादव एक भिंतीला टेकून डोळे मिटून झोपलाय. धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हे खेळाडू न्यझीलंडला रवाना होण्यापूर्वीचा हा फोटो आहे. 


T20 वर्ल्डकप गमावल्यानंतर भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, विक दिनेश कार्तिक, स्पिनर आर अश्विन, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मायदेशी म्हणजेच भारतात परतणार आहेत. 



दिनेश कार्तिक आणि आर अश्विन या दोघांची आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड करण्यात येणार आहे. टीम इंडियाचा संपूर्ण कोचिंग स्टाफही बदलण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे त्यांना विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे आता व्हीव्हीएस लक्ष्मण अँड कंपनी न्यूझीलंडला जाणार आहे.


टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची सिरीज खेळणार आहे.  T20 सिरीज 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सिरीजमधील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जाईल. तर 3 सामन्यांची वनडे सिरीज 25 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होणारे.


न्यूझीलंडविरूद्ध टी-20 सिरीजसाठी टीम इंडिया


हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (डब्ल्यूके), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्सी पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.