मुंबई : भारतीयांसाठी क्रिकेट (Cricket) म्हणजे धर्म आहे तर खेळाडू म्हणजे देव. आपल्याकडे प्रत्येक खेळाडूची सेपरेट असा तगडा फॅन फॉलोव्हर असतो. आपल्याला त्या त्या क्रिकेटरच्या मैदानातील कामगिरीबाबत आणि फार फार त्या खेळाडूच्या कमाईबाबत माहिती असते. मात्र अनेक खेळाडूंची कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला क्वचितच माहिती असते. आपण अशाच टीम इंडियाच्या (Team India Richest Cricketer) एका स्टार खेळाडूबाबत जाणून घेणार आहोत, ज्याचे वडील हे स्वत: सीईओ आहेत, सासरे हे डीजीपी आहेत, तर बायको वकील आहे. (team india mayank agrawal father is ceo father in law dgp and wife is lawyer)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण बोलतोय ते टीम इंडियाचा स्टार ओपनर मयंक अग्रवालबाबत. मयंक हा सध्या आघाडीचा खेळाडू आह. मयंकला इथवर पोहचवण्यात त्याचे वडील अनुराग अग्रवाल यांचा मोठा हात आहे. 


अनुराग अग्रवाल हे एका हेल्थकेअर कंपनीचे सीईओ आहेत. मयंकने त्याच्या बालपणाची मैत्रीण आशिता सूदसोबत लग्न केलं आहे. आशिता ही वकील आहे. या दोघांनी जून 2018 मध्ये सप्तपदी घेतल्या होत्या.  


तर मयंकचे सासरे म्हणजेच आशिताचे वडिल प्रवीण सूद हे माजी पोलीस आयुक्त राहिले आहेत. ते सध्या कर्नाटकाचे डीजीपी आहेत.  


गडगंज श्रीमंत क्रिकेटर


एका रिपोर्टनुसार, मयकंची एकूण संपत्ती ही 3.5 मिलियन अमेरिकी डॉलर इतकी आहे. हीच एकूण संपत्ती भारतातील रुपयात मोजायची झाल्यास एकूण 26 कोटी इतकी आहे. मयंकने ही सर्व कमाई बीसीसीआय -आयपीएल खेळून मिळणाऱ्या वेतनातून तसेच व्यवसायातून केली आहे.