Harbhajan Singh Retirment | क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर भज्जी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार?
भज्जी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर लवकरच नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हंटलं जातंय.
मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑफ स्पीनर हरभजन सिंहने ( Harbhajan Singh) क्रिकेटला अलविदा केला आहे. हरभजन गेल्या 5 वर्षांपेक्षा अधिक काळापासून टीममधून बाहेर होता. त्यामुळे तो लवकरच क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याची चर्चा होती, अखेर त्याने अपेक्षित होती ती निवृत्तीची घोषणा केलीच. दरम्यान भज्जी या क्रिकेटमधील निवृत्तीनंतर लवकरच नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हंटलं जातंय. (team india off spinner harbhajan singh announce his retirement 9 days after meet punjab congress state president navjyot singh siddhu might be start political innings)
निवृत्तीनंतर भज्जी राजकारणात (Politics) प्रवेश करणार असल्याचं म्हंटलं जातंय. तसंच त्याबाबतचे संकेतही मिळतायेत. भज्जीने गेल्या काही दिवसांआधी 15 डिसेंबरला माजी क्रिकेटर आणि (Punjab Pradesh Congress Committee President) पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे भज्जी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय
हरभजनने अनेक रेकॉर्ड केलेत. त्याने अनेकदा आपल्या कामगिरीने छाप सोडली. भज्जी टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय आहे. भज्जीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता. भज्जीसाठी क्रिकेट कारकिर्दीतील हा अविस्मरणीय क्षण होता.
भज्जीची तिन्ही फॉर्मेटमधील आकडेवारी
भज्जीने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. भज्जीने टेस्ट क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 बळी घेतले. तर टी 20 फॉर्मेटमध्ये 25 जणांना त्याने माघारी पाठवलंय.