IND vs SA 1st Test: टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सेंच्युरियन स्टेडियममध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवली जातेय. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांची निराशजनक कामगिरी दिसून आली. दरम्यान यावेळी सामना सुरु असताना एक मोठं कनफ्यूजन पहायला मिळालं. भारतीय डावाच्या 61व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर टाईम आऊट झाल्यानंतर डीआरएस घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमानुसार, ठराविक वेळेपर्यंत डीआरएसची मागणी न केल्यास रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे पाठवला जात नाही. मात्र यावेळी के.एल राहुलच्या बाबतीत असं घडताना दिसलं नाही.  


नेमकं प्रकरण काय?


टीम इंडिया फलंदाजी करत असताना 61व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कागिसो रबाडाने केएल राहुलला एक शॉर्ट बॉल टाकला. यावेळी बॉल त्याच्या शरीरापासून दूर जात असल्याचं दिसून आलं. मुख्य म्हणजे राहुलने बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. बॉल बॅटच्या अगदी जवळ जाऊन विकेटकीपरकडे गेला. अशात फिल्डरला बॉल बॅटला लागला असल्याचं वाटलं.


तत्कालीन कर्णधार डीन एल्गरने खेळाडूंना डीआरएसबाबत विचारलं. नेमका यावेळी गोंधळ झाला. दक्षिण आफ्रिकेचे फिल्डर्स डीआरएस घेण्यास तयार होते. मात्र अंपायरने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि ओव्हर संपल्याचं घोषित केलं.


टाईम आऊट झाल्यानंतर वापरला डीआरएस


अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा गोंधळ उडाला कारण त्यांनी डीएसआरची मागणी केली होती. मात्र यावेळी टाईम आऊट देखील झाला. मुख्य म्हणजे ही पूर्णपणे अंपायरची होती. अशा परिस्थितीत टाईम आऊट होऊनही डीआरएस देण्यात आला. 


नियमांनुसार, हे अजिबात योग्य नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे रिल्पेमध्ये केएल राहुलच्या बॅटला बॉल लागल्याचं दिसत नव्हता. ही घटना घडली त्यावेळी राहुल 70 रन्सवर खेळत होता. या सामन्यात के.एल राहुल सोडून इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही.  


टीम इंडियाची खराब सुरुवात


पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाची सुरुवात काही फारशी चांगली झालेली दिसली नाही. टीम इंडियाने दोन्ही ओपनर स्वस्तात माघारी परतले. यसस्वी जयस्वाल 17 आणि रोहित शर्मा अवघ्या 5 रन्सवर माघारी परतले. शुभमन गिल आणि विराट कोहलीला देखील मोठी खेळी करता आली नाही. टीम इंडियाकडून केवळ के.एल राहुलने शतकी खेळी केली आहे.