Hardik Pandya VIDEO Team India: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपल्या दमदार खेळाच्या जोरावर टीम इंडियाला अनेकवेळा विजय मिळवून दिलाय. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) हार्दिक पांड्या टीम भारतीय संघात आहे. मैदानावरच्या अष्टपैलू कामगिरीबरोबरच मैदानाबाहेर स्टाईलिश लूकमुळे हार्दिक पांड्या नेहमीच चर्चेत असतो. त्याची हेअरस्टाईल, टॅटू आणि महागड्या गाड्या यामुळे मैदानाबाहेरही तो आपलं लक्ष वेधून घेतो. इतकंच नाही तर हार्दिक सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीच्या कुटुंबियांची घेतली भेट
हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasha Stankovic) हिच्या कुटुंबियांची पहिल्यांदाच भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ हार्दिकने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिकला भेटून नताशाचं कुटुंब भावनिक झाल्याचं पाहिला मिळतंय. हा व्हिडिओ शेअर करत हार्दिकने एक कॅप्शन लिहिलं आहे, यात त्याने म्हटलंय व्हिडिओ आणि फोन कॉलनंतर अखेर आमची भेट झाली. नताशाच्या कुटुंबियांना पहिल्यांदा भेटलो. या या 'अद्भुत क्षणाबद्दल धन्यवाद'



2020 मध्ये नताशाला केलं प्रपोज
हार्दिक पांड्या आणि नताशाने जानेवारीत साखरपुडा केला. दुबईमध्ये (Dubai) हार्दिकने याटवर नताशाला अंगठी घालत प्रपोज केलं होतं. नताशाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात हार्दिक आपल्या गुडघ्यावर बसून तिच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. या दरम्यान बॅकग्राऊंडमध्ये मेरे हमसफर हे गीत वाजत आहे.


हार्दिक आणि नताशाला एक मुलगा असून त्याचं नाव अगस्त्या (Agastya) आहे.  हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांची जोडी खूप पसंत केली जाते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर हिट ठरतात आणि खूप व्हायरल होतात.