WTC Points Table : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia)  यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सिरीज खेळवली जात असून पर्थ येथे त्याचा पहिला सामना पार पडला.  या सामन्यात टीम इंडियाने (Team India) 295 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाला धक्का दिलाय. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकल्यामुळे टीम इंडियाचा WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. न्यूझीलंड टेस्ट सीरिज मध्ये पराभूत होऊन टीम इंडिया WTC रँकिंगमध्ये खाली कोसळली होती, मात्र आता पर्थ टेस्ट सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने मुसंडी मारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्थ टेस्टच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून फलंदाजी निवडली. यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करून 150 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाला गोलंदाजी करताना त्यांना 104 धावांवर ऑल आउट केले. त्यानंतर फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने 487 धावा केल्या आणि 535 धावांची आघाडी घेतल्यावर डाव घोषित केला. त्यानंतर टीम इंडियाच्या घातक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलिया फार काळ टिकू शकली नाही आणि त्यामुळे भारताने त्यांना 238 धावांवर ऑल आउट केले आणि 295 धावांनी सामन्यात विजय मिळवला. 


हेही वाचा : IND VS AUS : कसोटी सुद्धा जिंकली आणि टीम इंडियाला रोहित शर्माचा उत्तराधिकारीही सापडला


 


WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची मुसंडी : 


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची पहिली टेस्ट जिंकल्यावर टीम इंडिया WTC पॉईंट्स टेबलमध्ये नंबर दोनवरून नंबर 1 वर पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलियाची नंबर 2 वर घसरण झालीये.  भारताने आतापर्यंत 15 पैकी 9 टेस्ट सामने जिंकले आहेत तर त्यांना 5 सामन्यात अपयश मिळालंय तर एक सामना ड्रॉ झालाय. सध्या नंबर 1 वर असलेल्या भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ही 61.11 टक्के आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्यासाठी 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागणार होते. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिजमधील पहिला सामना जिंकल्यामुळे टीम इंडियाला WTC फायनलमध्ये जाण्यासाठी केवळ 3 सामने जिंकायचे आहेत. जर उर्वरित 3 सामने जिंकण्यात भारताला यश आलं नाही तर टीम इंडियाला WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. WTC फायनलची फायनल जून 2025 मध्ये लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल. 



भारताची  प्लेईंग 11: 


केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर) , ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11: 
 उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड